Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…

Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…

Katrina Kaif Merry Christmas: बॉलीवूड (Bollywood) स्टार कतरिना कैफने (Katrina Kaif) ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) बनवण्या मागची खास गोष्ट शेअर केली आहे. तमिळ संवाद हाताळण्यापासून ते दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या (Sriram Raghavan) समर्पणाचे कौतुक करण्यापर्यंत कतरिनाने चित्रपटातील तिची आव्हाने काय होती? आणि हा चित्रपट नेमका कसा घडला? हे सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)


“मेरी ख्रिसमस” च्या चित्रीकरणाच्या तिच्या अनुभवाबद्दल तिने खास गोष्टी सांगितल्या असून ती म्हणते “मेरी ख्रिसमस हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायक अनुभवांपैकी एक आहे. श्रीराम सरांनी मला माझ्या आतापर्यंतच्या सर्वात कठीण भूमिकांपैकी एक आव्हानात्मक काम दिलं आहे, असं मला वाटतं पण या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) काम करण्याच भाग्य मला लाभलं, अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘मेरी ख्रिसमस’ हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 60 कोटी रुपयांत या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sonu Sood ही झाला डीपफेकचा शिकार; तोतयाकडून पैशांची गरज असलेल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न

‘मेरी ख्रिसमस’च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या…: ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमाची निर्मिती 60 कोटी रुपयांत करण्यात आली आहे. या सिनेमात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. कतरिना-विकीसह संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टीनू आनंद या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

‘मेरी ख्रिसमस’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून जोरदार चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमाने 2.55 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 8 कोटींचा गल्ला कमावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube