Singham Again: ‘सिंघम अगेन’साठी कोणाला मिळालं तगडं मानधन; आकडा पाहून बसेल धक्का!

Singham Again: ‘सिंघम अगेन’साठी कोणाला मिळालं तगडं मानधन; आकडा पाहून बसेल धक्का!

Singham Again Starcast Fees: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘सिंघम अगेन’चा (Singham Again ) ट्रेलर लाँच झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता कमालीची आहे. या मस्त स्टारर चित्रपटाने आपल्या ट्रेलरमध्ये अशी खळबळ उडवून दिली आहे की चित्रपटाचे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण (Ajay Devgn), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), करीना कपूर (Kareena Kapoor), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), रणवीर सिंग आणि रवी किशन यांच्याशिवाय 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अर्जुन कपूरचीही भूमिका आहे. आता या चित्रपटातील कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळालं, ते पाहुयात..

अजय देवगण

बॉलीवूड लाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मीडिया रिपोर्ट्सनुसार अजय देवगणने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे. अभिनेत्याने 35 कोटी घेतले आहेत. विशेष म्हणजे अभिनेता या चित्रपटाची सहनिर्मितीही करत आहे.

करीना कपूर

या चित्रपटाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे की, करिना यात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार करीना या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेत आहे.

अर्जुन कपूर

या चित्रपटात अर्जुन कपूर एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत आहे. बातम्यांनुसार, अभिनेता या भयानक पात्रासाठी 6 कोटी रुपये घेत आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

यावेळी सिंघमच्या या फ्रेंचायझी चित्रपटात दीपिका पदुकोणही आहे. प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार दीपिका यासाठी 6 कोटी रुपये घेत आहे तर रणवीर सिंग 10 कोटी रुपये घेत आहे.

बाजीरावचा Singham Again ‘या’ दिवशी ओटीटीवर होतोय रिलीज! कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या

जॅकी श्रॉफ

मिळालेल्या वृत्तांनुसार जॅकी श्रॉफ या सिनेमासाठी मेकर्सकडून 3 कोटी रुपये घेत आहे. यामध्ये तो पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत असून तो स्फोटक ॲक्शन अवतारात दिसत होता.

अक्षय कुमार

सिंघम अगेनमध्ये अक्षय कुमार कॅमिओ अवतारात आहे. पण या कॅमिओसाठीही खिलाडी कुमारने एवढी मोठी रक्कम जमा केली आहे, की तुम्हालाही धक्का बसेल. मिळालेल्या वृत्तांनुसार अभिनेत्याने 20 कोटी रुपये घेतले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube