ज्या मालमत्तेबद्दल चर्चा ती अजय देवगणचं घर नाहीच! BMC च्या कारवाईवर टीमचं स्पष्टीकरण
Ajay Devgn house BMC action बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर मुंबई BMCने केलेल्या कारवाईवर त्यांच्या कार्यालयाकडून निवेदन आलं आहे.
The property in question is not Ajay Devgn’s house at all! Team clarifies following BMC action : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) जुहू भागात असलेल्या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) कारवाई केली. ही कारवाई अजय देवगणच्या बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या सलून आणि स्पा सेंटरच्या बांधकामावर करण्यात आली आहे. या स्पा सेंटर आणि सलूनच्या बांधकामावर महानगरपालिकेने बंदी घातली होती. अजय देवगणला याबाबत नोटीसही बजावली होती. नोटीस देऊनही बांधकाम न थांबवल्याने महानगरपालिकेने या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला आणि बांधकाम पाडलं.
अभिजीत दिपकेंना न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर, वर्षभर शांतता राखण्याचं हमीपत्र द्यावं लागणार
दरम्यान आता यावर अजय देवगण यांच्या कार्यालयाकडून निवेदन आलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ज्या मालमत्तेबद्दल चर्चा होत आहे, ती अजय देवगण यांचे निवासस्थान नसून एक स्वतंत्र मालमत्ता आहे, जी भाड्याने दिली गेली आहे. आम्ही आमच्या एका मालमत्तेसाठी बीएमसी (BMC) कडे आवश्यक परवानगी मिळण्याकरिता अर्ज केला असून, बीएमसीचे सर्व नियम, विनियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करत आहोत. बीएमसीच्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल आणि फेरफार करण्यात आले आहेत.
शिस्तप्रिय माणसचं आयुष्यात यशस्वी का होतात? वाचा, माहिती नसलेलं गुपित!
अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झाला आहे. हा बंगला फ्लोरियन ह्युरेल सलून प्रायव्हेट लिमिटेडला पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात आला असून, या कराराची एकूण किंमत 10.61 कोटी रुपये आहे. या ठिकाणी स्पा आणि सलून सुरू करण्याच्या उद्देशाने बंगल्यात अंतर्गत बदल आणि बांधकाम सुरू होते.
मात्र, या जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या सादर करण्यात न आल्याने मुंबई महापालिकेने बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावली. दुसरीकडे, परिसरातील रहिवाशांनीही या प्रस्तावित व्यवसायाला विरोध दर्शवला आहे. स्पा आणि सलून सुरू झाल्यास परिसरात लोकांची वर्दळ वाढेल, पार्किंगचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सुरक्षितता आणि गोंगाटाच्या समस्यांनाही सामोरं जावं लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील बांधकामावरून महापालिका आणि स्थानिक रहिवाशांच्या आक्षेपांमुळे वाद निर्माण झाला आहे. महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असली, तरी आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा अभिनेत्याच्या टीमने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.