Khatron Ke Khiladi 13′ च्या सेटवर स्टंट करताना शिव ठाकरे जखमी; पहा नेमकं काय घडलं…

Khatron Ke Khiladi 13′ च्या सेटवर स्टंट करताना शिव ठाकरे जखमी; पहा नेमकं काय घडलं…

Shiv Thakare Injured: ‘खतरों के खिलाडी १३’ या बहुचर्चित शोचा सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. (Khatron Ke Khiladi 13 ) या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभाग नोंदवला आहे. परंतु हा कार्यक्रम प्रसारण होण्यापूर्वीच अनेक स्पर्धक स्टंट करत असताना जखमी झाल्याचे समजत आहे. शिव ठाकरेचा (Shiv Thakare) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ( Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)


या व्हिडीओत ( Video Viral) शिवच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटाला टाके देखील पडल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शिव नेहमीच लढवय्या म्हणून ओळखला जात असतो. यामुळे त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक चाहते त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला ‘योद्धा’ म्हणत आहेत.

तसेच ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगच्या दरम्यान स्टंट करत असताना अनेक स्पर्धक जखमी होत असल्याचे दिसून येत आहे. नायरा बॅनर्जी, रोहित रॉय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करत आहे. ‘खतरों के खिलाडी १३’ या कार्यक्रमातील स्पर्धक स्टंटबाजी करत असताना दिसून येत असतो. दरम्यान त्यांना अनेक वेगवेगळ्या आव्हानांचा मोठा सामना पत्करावा लागतो. आता १५ जुलैपासून हा कार्यक्रम चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Box Collection: वीकेंडला ‘सत्यप्रेम की कथा’ची छप्परफाड कमाई! बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलंत?

कलर्स मराठीवर रात्री ९ वाजता चाहते हा कार्यक्रम पाहू शकणार आहेत. शिव ठाकरे आणि श्रीजिता डे ‘बिग बॉस १६’मध्ये देखील सहभागी झाले होते. तसेच त्यांची चांगली मैत्री होती. श्रीजिता नुकतीच लग्नबंधनामध्ये  अडकली आहे. परंतु कामामुळे शिव तिच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिला नाही. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने श्रीजिताला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये डेजी शाह, अर्जित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद आणि शिव ठाकरे हे स्पर्धक सहभागी असल्याची माहिती मिळाली आहेत. या कार्यक्रमाची आता चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube