चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा

चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा

Article 370 Box Collection Day 4: यामी गौतम (Yami Gautam) प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळीही असेच काहीसे अभिनेत्रीने केले आहे. नुकतचं यामीचा ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. (Box Collection) चित्रपटाला समीक्षकांसोबतच चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई केली होती आणि आता आठवड्याच्या दिवशीही मोठा गल्ला कमावत आहे. ‘आर्टिकल 370’ चा चौथ्या दिवशी एकूण किती गल्ला कमावला आहे, चला तर मग पाहूया…

‘आर्टिकल 370’ बद्दल बोलायचे झाले तर यामी गौतमसोबत अरुण गोविल आणि किरण कर्माकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अरुण गोविल यांनी पीएम मोदींची तर किरणने अमित शहा यांची भूमिका साकारली होती. तर यामी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात कलम ३७० हटवल्यानंतर कोणत्या गोष्टींवर परिणाम होईल ते दाखवण्यात आले आहे.

चौथ्या दिवशीचा गल्ला: ‘आर्टिकल 370’ च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सकनील्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.9 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.4 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 9.6 कोटी रुपये कमावले, त्यानंतर एकूण कलेक्शन 26.15 कोटी रुपये झाले आहे.

Lagnna kallol: आदर्श शिंदेच्या आवाजातील प्रेमातील दुःख व्यक्त करणार “घाव लागला” गाणं प्रदर्शित

आर्टिकल 370 ला खूप पसंत केले जात आहे आणि सर्वजण या सिनेमाचे तोंडभरून कौतुक करत आहेत, त्यामुळे हा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करेल. आठवड्याच्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन थोडे कमी असू शकते.
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 34 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामी गौतमचे पती आदित्य धर यांनी ‘आर्टिकल 370’ तयार केले आहे. यामी आणि आदित्यने याआधी उरी चित्रपटात एकत्र काम केले आहे. उरीची निर्मितीही आदित्यनेच केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज