T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा

T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा

T20 World Cup 2024 : जून महिन्यात टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होतील. या स्पर्धांसाठी लवकरच संघाची घोषणा करावी लागणार आहे. 15 सदस्यीय संघाची निवड करण्यासाठी आयसीसीने 1 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे लवकरच टीम इंडियाची घोषणा झालेली दिसेल. यंदा संघात खेळाडू निवड करताना निवडकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण यंदा स्पर्धा जास्त असून खेळाडूंची गर्दी झाली आहे. टीम निवड करताना कोणत्याही नव्या खेळाडूचा विचार केला जाणार नाही अशी माहिती मिळाली आहे.

विराट कोहली सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. भारतात सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट लीगमध्ये विराट शानदार फलंदाजी करत आहे. त्याची कामगिरी निराशाजनक राहिली असती तरी त्याची निवड करावीच लागली असती. अपघातातून बरा झालेला ऋषभ पंत याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या विकेटकिपरसाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा आहे. दोघांच्या कामगिरीत फारसा फरक नाही.

‘रोहित शर्मा अन् आगरकर ठरवतील तसं’; T20 वर्ल्डकपसाठी कार्तिकचा क्लिअर मेसेज

टी 20 क्रिकेट लीगमध्ये हे दोन्ही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. तर दुसरीकडे दिनेश कार्तिक सुद्धा त्यांना टक्कर देत आहे. दिनेश कार्तिक देखील विकेटकिपर फलंदाज आहे. याआधी त्याने टी 20 विश्वचषक मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंमध्ये कोण बाजी मारणार याचं उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल.

फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि रिंकू सिंह प्रबळ दावेदार आहेत. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शुभमन गिलचाही विचार होऊ शकतो. गोलंदाजांचा विचार केला तर जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. त्यानंतर सिराज आणि अर्शदिप सिंह यांची नावे आहेत. याशिवाय आणखी एका वेगवान गोलंदाजांची गरज राहणार आहे. कुलदीप यादव एकमेव फिरकी गोलंदाज असू शकेल.

पंतची एन्ट्री, राहुलची वाट बिकट; T20 वर्ल्डकप संघात निवड कठीण; कारण काय?

यादवच्या सोबत अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा असतील. तसेच हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असू शकेल. सध्या हार्दिक अपयशी ठरत आहे. त्यामुळे निवडकर्त्यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांना काहीही करून पांड्याला संघात घ्यायचे आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीत असे ठरले की हार्दिकची संघात निवड करायची असेल तर त्याने सध्या सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत चांगली गोलंदाजी करावी.

क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार संघ व्यवस्थापन रियान पराग आणि अभिषेक शर्मा यांसारख्या नवख्या खेळाडूंबाबत कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ इच्छित नाही. संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी 28 किंवा 29 एप्रिल रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा 2 जून ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube