Order of St. Andrew the Apostle पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा मिळाला रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

Order of St. Andrew the Apostle पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा मिळाला रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

Order of St. Andrew the Apostle :  सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) रशिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा रशियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ (Order of St. Andrew the Apostle ) दिला आहे.

मॉस्को क्रेमलिनच्या सेंट कॅथरीन हॉलमध्ये 9 जुलैला हा सन्मान देण्यात आला. मॉस्कोमधील एका आयोजित कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. दोन्ही देशाच्या मैत्रीपूर्ण संबंधासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष योगदान दिल्याने रशियाकडून दुसऱ्यांदा मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे. मोदींनी रशियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल केल्याबद्दल पुतीन यांचे आभार मानले. तसेच ते भारतातील लोकांना समर्पित करत असल्याचे सांगितले.

तर पंतप्रधान मोदींना हा सन्मान मिळाल्याबद्दल परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा सेंट अँड्र्यू द अपॉस्टलचा ऑर्डर 2019 मध्ये जाहीर करण्यात आला होता. दोन्ही नेत्यांमध्ये आज चर्चेचा अजेंडा प्रामुख्याने आर्थिक होता.  राजकीय क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य, मोठ्या प्रमाणावर व्यापार, महसूल, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा झाली. तसेच जागतिक स्तरावर, दोन्ही नेत्यांनी ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्ससह द्विपक्षीय प्रतिबद्धतेच्या स्थितीचाही आढावा घेतला. अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली.

लक्षात ठेवा! सहमतीने सेक्सचं वय 16 नाही तर… सुप्रीम कोर्टानेही पुन्हा दिली आठवण

ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल जार पीटर द ग्रेट यांनी सेंट अँड्र्यू (येशूचा पहिला प्रेषित आणि रशियाचा संरक्षक संत) यांच्या सन्मानार्थ 1698 पासून हा सम्मान देण्यात येतो. रशियामध्ये हे सर्वात उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी सेवेसाठी दिले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज