HSC SSC Exam Dates : दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; बोर्डाने केला मोठा बदल
HSC SSC Exam Dates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर (HSC SSC Exam Dates) केल्या आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात पार पडणार असल्याची माहिती बोर्डाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलीयं.
Independence Day: अक्षय, राजकुमार आणि जॉन अब्राहम? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तर माध्यमिक शालांत म्हणजेच दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर, तसेच व्यावसायिक प्रवेश आदी बाबींचा विचार करुन बोर्डाकडून परीक्षेच्या वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींसाठी पुरेसा अवधी मिळावा, पुरवणी परीक्षा घेऊन त्याचा निकाला जाहीर करणे, यासाठी नेहमीप्रमाणे परीक्षा 10 ते 15 दिवस आधी आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.
ठरलं! विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाला उतरवायचं; फडणवीस करणार शिक्कामोर्तब
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा : शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत काही हरकती, सूचना असतील तर 23 ऑगस्टपर्यंत कळवण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.