दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षार्थ्यांना दिलासा; मुसळधार पावसामुळे परीक्षा ढकलली पुढे
10th and 12th supplementary exams postponed due to rain : राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईमध्ये शाळा-महाविद्यालय आणि कार्यालायांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता 10 वी आणि 12 वी पुरवणी परिक्षा (supplementary exams) देणाऱ्या परीक्षार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली आहे.
Pune Rain Alert : पावसाचा पुणे – मुंबईला फटका, रेल्वे वाहतूक बंद; ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षा देणाऱ्या दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांची उद्या 26 जुलै रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता उद्या ऐवजी दहावी आणि बारावीची अनुक्रमे 31 जुलै आणि 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Paris Olympics 2024 मध्ये महिला तिरंदाजी टीमची बाजी; दमदार कामगिरीसह उपांत्यपूर्व फेरी गाठली
यामध्ये 26 जुलैला दहावी बोर्डच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन हा पेपर सकाळी 11 ते दुपारी एक दरम्यान होणार होता. मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन दरम्यान होईल. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन त्याचबरोबर अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान एमसीव्हीसी पेपर दोन हे तीन पेपर होणार होते. हे तीनही पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
अजित पवारांकडून पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा
पुणे आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुण्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा घेतला.