सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ‘नीट’चा निकाल पुन्हा जाहीर; एका क्लिकवर स्कोअर कार्ड करा डाउनलोड

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ‘नीट’चा निकाल पुन्हा जाहीर; एका क्लिकवर स्कोअर कार्ड करा डाउनलोड

NEET Result : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान 18 जुलै रोजी NEET प्रकरणी मिळालेल्या सूचनांचं पालन करून NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन त्यांचं सुधारित स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार आहे. (NEET Result ) 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने NTA ला NEET चे निकाल शहर आणि केंद्रानुसार पुन्हा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आज 20 जुलै दुपारपर्यंतची मुदत दिली होती.

असे चेक करा मार्क गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, या तारखेपासून होणार बुकिंग सुरू

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागंल. सुधारित स्कोअर कार्ड पाहण्याची लिंक वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर आहे, या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर NEET 2024 सुधारित स्कोअर कार्डसाठी Click Here लिंकवर क्लिक करा करा. आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांक आणि सेक्युरीटी पिन यांसारखी लॉगिन क्रेडेंशियल प्रविष्ट केल्यानंतर तुमचा निकाल दिसेल.

18 जुलै रोजी झाली होती सुनावणी  माझा देह गेला तरी चालेल; अजय महाराजांचा फडणवीसांच्या बंगल्यासमोर ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात

न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या 18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने एनटीएला विद्यार्थ्यांच्या ओळखीची गोपनीयता राखून निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. परीक्षा रद्द करणं, फेरपरीक्षा घेणं आणि गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करणं या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने 22 जुलै रोजी अंतिम निकाल देण्याची अपेक्षा आहे. NTA ने 5 मे रोजी NEET UG 2024 ची परीक्षा घेतली आणि 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर झाला. NTA द्वारे प्रदान केलेल्या डेटावर आधारित, 9,96,393 पुरुष उमेदवार, 13,31,321 महिला उमेदवार आणि 17 ट्रान्सजेंडर उमेदवार परीक्षेला बसले होते. मात्र, यानंतर अशा काही घटना समोर आल्या, त्यानंतर परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या