माझा देह गेला तरी चालेल; अजय महाराजांचा फडणवीसांच्या बंगल्यासमोर ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Ajay Barskar Maharaj : पंढरपूरमध्ये अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. (Ajay Barskar) त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी ‘सागर’ या निवास्थानासमोर आंदोलन पुकारलं. दरम्यान, माध्यामांशी बोलताना त्यांनी मला जीवं मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा खळबळजनक दावाही केला. सागर बंगल्याच्या समोर फुटपाथवर बारसकर आंदोलनासाठी बसले होते. दरम्यान, त्यांना काहीवेळाने पोलिसांनी तिथून ताब्यात घेत पोलीस स्टेशनला हलवलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नीटचा निकाल पुन्हा जाहीर; एका क्लिकवर स्कोअर कार्ड करा डाउनलोड
यावेळी बोलताना बारसकर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केला की, तुम्ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी इथ बसला आहात असा आरोप होतोय त्यावर अरे मी कशाला प्रसिद्धी मिळवू, मला राजकारणात जायचं नाही, मला निवडणूक लढवायची नाही, मला पैसा कमवायचा नाही मग मी कशाला प्रसिद्धीसाठी असं करेल असं बारसकर यावेळी म्हणाले. तसंच, आपणही मराठा आरक्षणासाठी लढत आहोत असंही ते यावेळी म्हणाले.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात माझी गाडी जाळली. मी थांबलो तेव्हा काही लोक माझी चौकशी करत होते. त्यापूर्वी मला १०-१२ धमकीचे फोन आले होते. रात्री २ वाजता माझी गाडी जाळली. मला मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली नाही. म्हणून मी वेगळा झालो. मी समाजाच्या विरोधात नाही, असंही अजय महाराज बारसकर म्हणाले आहेत.
गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, या तारखेपासून होणार बुकिंग सुरू
काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील म्हणाले होते की, मी सागर बंगल्यावर जातो. एवढ्या आवेशात म्हणालात तर गेला का नाहीत? असा थेट प्रश्नीह बारसकर यांनी जरांगे यांना यावेळी केला. तसंच, तुम्ही गेला नाहीत आता मी जाणार, पोलिसांना काय करायच आहे ते कराव, माझा मृत्यू झाला तरी तो मराठा समाजासाठी असेल. मी फडणवीस यांना भेटणार असं म्हणत चालू पत्रकार परिषदेतून अजय महाराज हे सागर बंगल्यावर दाखल झाले. दरम्यान, जेथे बारसर आंदोलन करत होते तिथून पोलिसांनी बारसकर यांनी ताब्यात घेतलं आहे.