Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल

  • Written By: Published:
Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल

Ajay Maharaj Barskar : मराठा आंदोलनासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बारस्करांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. 40 लाख रुपये घेऊन बासस्कर माझ्याविरुध्द बडबड करत आहेत, असा आरोप जरांगेंनी केला होता. त्याला आता बारस्कर यांनी प्रत्युत्तर दिलं.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार : प्रशासकीय हालचालींना वेग 

अजय बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बारस्कर हे वारंवार जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आताही बारस्कर म्हणाले, जरांगेंनी माझ्यावर सरकारकडून विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. मी तमाम मराठा बांधवांना सांगू इच्छितो की, माझ्यावर यापूर्वी एकही आरोप झाला नाही.मात्र, जरांगेंनी माझ्यावर बलात्कार, विनयभंग, तीनशे कोटींची संपत्ती आणि आता 40 लाख रुपये सरकारकडून घेतल्याचा आरोप केला. जरांगेंना माझा सवाल आहे की, जरांगेच्या म्हणण्यानुसार, माझ्याकडे 300 कोटींची मालमत्ता असेल तर मी 40 लाख रुपये घेणार का?

नांदेडमधील काँग्रेस अशोक चव्हाणांनी शून्यावर आणली, ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश 

बारस्कर म्हणाले, जरांगे म्हणतात की माझा बारस्करांशी काहीही संबंध नाही. मी जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांना पाणी प्यायला सांगितले. वास्तविक, त्यांनीच मला तिथे बोलावलं होते, मी स्वतः तिथे गेलो नाही. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मी लवकरच पुरावे सादर करणार आहे. यांनी तुकाराम महाराजांना संत अन् फंत बोलून अपमान केला. माझा देहू संस्थानशी काही संबंध नसेल, पण देहू संस्थान हा अपमान कसा सहन करू शकतो, असं बारस्कर म्हणाले.

बारस्कर यांनी जरागेंच्या काही साथीदारांच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या. जरांगे यांच्या विरोधात मी आयकर विभागात जाणार असल्याचा इशारा बारस्कर यांनी दिला. तसचं माझी आणि जरांगेंची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करून घेण्याचे आव्हानही बारस्कर यांनी केलं.

पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणाचे कुटुंब राहिले?
आम्ही तुला सामाजिक चळवळीचे प्रश्न विचारले होते आणि तू आमच्याघरापर्यंत आला. आम्हाला माहिती नाही का, मुंबईला मोर्चा आल्यावर पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणाचे कुटुंब राहिले? माझ्याकडे व्हिडिओ नाहीत?पण मला मला कोणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही तुकोबारायांचे वारकरी आहोत याचे असे 50 ते 100 रेकॉर्डिंग आहेत, असा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज