नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा जरांगेंना थेट इशारा

नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा जरांगेंना थेट इशारा

Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच नारायण राणे यांना समजावून सांगण्याची विनंती आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्याकडे केली. त्यावरुन नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नितेश राणे यांनी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की, राजकीय स्टेटमेंट (political statement)करु नका, तुम्ही राजकीय स्टेटमेंट बंद करा, त्यानंतर कोणीही तुमचा विरोध किंवा उलट स्टेटमेंट देणार नाही, असेही यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्था भाजपकडून खालसा : 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या हितासाठी लढत आहेत. पण राज्य सरकार देखील त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात नसल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. तुम्ही जसं समाजासाठी लढताहेत तसं नारायण राणे यांनी देखील आरक्षण देऊन दाखवलं आहे. आपण समाजबांधव म्हणून एकमेकांबरोबर उभे राहू. आपल्याला समाजाला मोठं करायचं आहे.

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना

समाजावर कुठलही गालबोट लावायचं नाही. म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेली ती भूमिका आहे. शेवटी जरांगे पाटील आमचे समाजबांधवच आहेत. ज्या दिवशी जरांगे पाटील राजकीय भूमिका घ्यायचं बंद करतील त्या दिवशी हे असं काहीच होणार नाही. किंवा त्या दिवशी असा विरोध किंवा उलटे स्टेटमेंट देणार नाही, असेही यावेळी नितेश राणे म्हणाले.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी लढावं, आम्ही देखील आत्तापर्यंत तेच केलेलं आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण मराठा समाजाचं भविष्य कसं घडेल? यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करु असंही नितेश राणे म्हणाले.

आम्हाला फक्त हे अपेक्षित आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय स्टेटमेंट करु नये. आम्हाला ते अपेक्षित नाही. त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं, आम्ही सर्वजण त्यांचं आत्तापर्यंत स्वागतच करत आलेलो आहोत. मध्यंतरी देखील सरकारसोबत संवाद साधण्याच्या प्रक्रियेत मी स्वतः त्यांच्या संपर्कात होतो, आणि आजही काही विषयांमध्ये त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आम्ही काही त्यांचे विरोधक नाहीत. मात्र त्यांनी फक्त राजकीय स्टेटमेंट टाळावीत एवढाच मैत्रीचा आणि समाजबांधव म्हणून देईल असेही यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube