शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड (Pimpri ) महापालिकेच्या शाळेतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (Pimpri Chinchwad News) जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी चिंचवडगाव येथील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर या शाळेत घडली.
या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला. तातडीने त्याला चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हास्पिटलमध्ये (YCM Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. चिंचवड पोलीस (Chinchwad Police) याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.
Ahmednagar News: नगरसेवकावर गोळीबार प्रकरणी पारनेर कडकडीत बंद
नेमकं काय घडलं? चिंचवडगाव येथील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून सार्थकचा मृत्यू झाला. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सार्थकच्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेचा अधिकचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
या घटनेची चौकशी पालिका करणार? हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा पोटचा गोळा मला परत द्या. अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली आहे. तर घडलेल्या दुर्दैवी घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.