महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार : प्रशासकीय हालचालींना वेग

  • Written By: Published:
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार : प्रशासकीय हालचालींना वेग

पिंपरी – राज्यालोकसभा (Lok Sabha Elections) व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. काल १२ बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. तत्पूर्वी दोन टप्प्यांमध्ये प्रशाकीय खांदेपालट करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आयुक्तांचीही बदली होणार असल्याची शक्यात आहे. त्यासाठी भाजपा, शिवसेनेच्या स्थानिक आमदार, खासदार नेत्यांनी मुंबईत खलबते सुरू केली आहेत.

नांदेडमधील काँग्रेस अशोक चव्हाणांनी शून्यावर आणली, ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

निवडणुका मुक्त तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुक प्रक्रियेशी सबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृह जिल्हा असलेल्या पोलीस दलातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपायुक्त आदी तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून केल्या आहेत. हा नियम आता महापालिका आयुक्तांनाही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची बदली निश्चित मानली जाते.

भाजप घर आणि पक्ष फोडतेच, पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडतेय; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचीही मुदतपूर्व बदली होणार, असे बोलले जात होते. मात्र, आयुक्त सिंग आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची मध्यंतरी भेट घेतली. त्यामुळे आयुक्त आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये ‘मनोमिलन’ झाले, अशी चर्चा आहे. परंतु, आयुक्त सिंग आणि शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांमधील समन्वय बिघडला. आयुक्त आमदार-खासदारांनी पाठपुरावा केलेल्या विविध विकासकामांमध्ये जाणीवपूर्वक हयगय करताहेत, अशी तक्रार भाजपा-सेना खासदार व आमदारांनी सीएम शिंदेंकडे केली. त्यामुळे आयुक्त सिंह रडारवर आले असून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चौथ्या टप्प्यात आयुक्त सिंग यांना ‘निरोपाचा नारळ’ मिळणार, असे चित्र आहे.

दरम्यान, सिंग यांच्या जागी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सेनेतील बड्या नेत्यासोबत भोसले यांचा सलोखा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपा-सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये डॉ. भोसले यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज