Sharad Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांना मिळाला नवा शिलेदार

Sharad Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांना मिळाला नवा शिलेदार

Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ शेवाळे यांनी निवड केली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी शरद पवार गटाकडून शहराध्यक्षाची चाचपणी सुरू होती. मात्र तसा चेहरा मिळत नव्हता. आज अखेर तुषार कामठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून ते आता शरद पवारांचा किल्ला लढवणार आहेत.

आज सिम्बीओसिस कॉलेज पुणे येथे राष्ट्रवादी इंजिनिर्स सेलच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तुषार कामठे यांना शहराध्यक्ष्य पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे,जयदेव गायकवाड,युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासोबत जोमाने काम करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार कामठे म्हणाले.

India Alliance Rally : इंडियाची आघाडीची भोपाळमधील पहिलीच सभा रद्द; कमलनाथ यांची माहिती

कोण आहेत तुषार कामठे?
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार कामटे हे 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते महापालिकेचा शेवटचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. भाजप सोडण्यापूर्वी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे कामठे यांची चर्चा शहरभर झाली होती. आता भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा तीन पक्षाला रोखण्याचा आव्हान कामठे यांच्यापुढे असणार आहे. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे आहेत.

Devendra Fadanvis : ओबीसी आरक्षणात नवा वाटेकरी येणार नाही; फडणवीसांचं आश्वासन

दरम्यान, आता खुद्द शरद पवार यांनी पुण्यात लक्ष घातले आहे. लवकरच शरद पवार यांचा पुण्यात रोड शो होणार आहे. शरद पवार 27 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. याच दिवशी ते पुण्यात रोड शो करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube