Pune Rains : मोठी बातमी! लवासात दरड कोसळली; चार जण अडकल्याची भीती
Pune Heavy Rains : पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान (Pune Heavy Rains) घातले आहे. पावसाने शहराची दैना उडाली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन अलर्ट (Pune Rains) मोडवर असून आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे. येथील दोन व्हिलांवर (बंगले) दरड कोसळल्याची माहिती आहे. या घटनेत दोन ते चार जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. कदाचित हे चार जण दरडीखाली अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rains) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rainfall) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील खडकवासला भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील शाळा आज गुरुवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणेकरांनो घाबरू नका, वेळ प्रसंगी नागरिकांना एअरलिफ्ट करू; CM शिंदेंची ग्वाही