पुणेकरांनो घाबरू नका, वेळ प्रसंगी नागरिकांना एअरलिफ्ट करू; CM शिंदेंची ग्वाही

पुणेकरांनो घाबरू नका, वेळ प्रसंगी नागरिकांना एअरलिफ्ट करू; CM शिंदेंची ग्वाही

Pune Rain Eknath Shinde Update : पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत. लष्कर पोहोचत आहे. वेळ पडल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने पावसात अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचे काही कारण आहे. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहे. एनडीआरएफच्या बोटीही रवाना केल्या आहेत. लष्कराचीही मदत उपलब्ध होणार आहे. पुणे मनपा आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी चर्चा केली आहे. वेळ पडल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना एअरलिफ्ट करुन सुरक्षित स्थळी नेऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rains) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rainfall) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

LIVE BLOG : पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट; शाळांना सुट्टी, रस्ते पाण्यात, शहराची उडाली दैना

राज्यात पुढील 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण भागातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरालाही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे शहरात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube