Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल

Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल

Stormy rain and Metro stopped causes to Plight of passengers in Mumbai : पुण्यानंतर आता मुंबईला ( Mumbai ) देखील अवकाळी पावसाने अक्षरषः झोडपले आहे. या पावसासोबत प्रचंड मोठे वादळ ( Stormy rain ) देखील सुटले होते. मुंबईत पश्चिम उपनगरात काही ठिकाणी धुळीचे वादळ सुटले होते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये बॅनर कोसळल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प झाली आहे.

राज्यात चौथ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, 11 मतदारसंघाचा समावेश

त्यामुळे एकीकडे मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मेट्रो देखील ठप्प झाली आहे. यामध्ये वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान बॅनर कोसळल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे त्यामुळे ऐन संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या अवकाळी पावसाने मुंबईला अक्षरषः झोडपले आहे.

माजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीचं नाव मतदार यादीतून गायब; चौकशीची मागणी!

तसेच ही पावसामुळे ही सेवा सुरळीत करता येत नाही. कारण त्यासाठी संपूर्ण वीज बंद करून पाऊस थांबणे गरजेचं आहे. गेल्या एक तासापासून मुंबईत अचानक वातावरण बदललं अन् वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे तळे साचले असून वादळामुळे हवेत धुळीचे लोटच्या लोट उठल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये बॅनर कोसळल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube