Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) मोठी कारवाई करत 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. माहितीनुसार, कोट डायव्हरी या देशाच्या नागरिकाने अमली पदार्थांच्या तब्बल 77 कॅप्सुल गिळल्या होत्या.
या कॅप्सुल शस्त्रक्रीया करून बाहेर काढण्यात आल्या. महसूल गुप्तचर संचालनालयाने कोट डायव्हरी नागरिकाकडून 1 कीलो 468 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यांची एकूण किंमत 15 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय झाल्याची माहिती डीआरआय मुंबई झोनल युनिटला मिळाली होती. या माहितीवरून डीआरआय युनिटने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत डीआरआयने एका कोट डायव्हरी नागरिकास ताब्यात घेतलं आहे. त्याने चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती देखील डीआरआयने दिली आहे.
…तेव्हा निकालाआधीच आमचा भाजपला पाठिंबा होता; सुनिल तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
तपासात, त्याने यापूर्वी देखील अंमली पदार्थांची तस्करी केल्याची माहिती दिली आहे. तो तस्करी करताना हे कॅप्सूल्स आपल्या शरीरातून नेत असल्याचेही माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने दिली आहे.
Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा