Hero Motocorp चे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी ईडीचा छापा…

Hero Motocorp चे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी ईडीचा छापा…

Hero Motocorp : हिरोमोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने(ईडीने) छापा मारला आहे. कर चुकवल्याप्रकरणी ईडीकडून पवन मुंजाळ यांच्या घरी छापा मारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आहे. त्यामुळे आता पवन मुंजाळही ईडीच्या रडारवर आले आहेत.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

महसुली गुप्तचर संचालनालयाने हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ यांच्या निकटवर्तीयाकडून अघोषित परदेशी चलन जप्त केले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपाने संभाजी भिडेंना दिले आहे का ? पटोलेंचा थेट सवाल

सुत्रांच्या माहितीनूसार करचुकवेगिरीप्रकरणी ईडीने मुंजाळ यांच्या निवासस्थानी छापा मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विभागाने हिरो मोटोकॉर्पच्या दिल्लीतील कार्यालयाकडून छापे टाकण्यात आले होते. तसेच मागील वर्षी प्राप्तिकर विभागाने हिरो मोटोकॉर्पच्या देशभरातील 25 ऑफिसेसवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीच्या अध्यक्षांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले होते. करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते.

दरम्यान, हिरो मोटोकॉर्पच्या प्रमुखांच्या घरी ईडीने छापा मारल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मंगळवारी कंपनीचे शेअर 4 टक्क्यांने घसरुन 3 हजार 66 रुपयांवर होते. त्यानंतर हा व्यवहा 3 हजार 100 रुपयांवर बंद झाला. होंडा कंपनीसोबतची पार्टनरशिप हिरो समूहाने 2011 मध्ये संपवली होती. त्यानंतर पवन मुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हिरो मोटोकॉर्पने जागतिक पातळीवर विस्ताराचे पाऊल उचलण्यात आलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube