देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा समावेश

देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा समावेश

Email threat to Bomb Airport : आज देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपुरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. (Threatened blow airport) ई-मेलच्या माध्यमातून या धमक्या आल्या आहेत. (Airport) या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, सतर्कता म्हणून बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक, अग्निशमन दल यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

भीतीचं वातावरण

यामध्ये प्राथममिक पातळीवर तपास केला असता हा इ-मेल कुणी पाठवला, कुठून हा मेल आला आहे याबाब अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. परंतु, हा मेल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संचालकांना असल्याने विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये बॉम्ब कोठे ठेवला आहे याचं लोकेशन देण्यात आलेलं नाही. दरम्यान, अशा पद्धतीची धमकी आल्याची बातमी पसल्याने परिसरातही नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावण आहे.

 

नंतर विमान सुरू करण्यात आले

धमकीचा इ-मेल आल्यानंतर त्याबाबत शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या धमकीमध्ये नागपूरसह मुंबई, भोपाळ, गोवा, कोलकाता यासह इतरही शहरांचा समावेश आहे. तसंच, सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत विमानांची ये-जा सुरु असते. परंतु, हा मेल आल्याने सकाळी 10 ते 6 पर्यं विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, तपासणीत काही न सापडल्याने विमानं सुरू केले आहेत.

 

हाय अलर्ट देण्यात आला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा इ-मेल आज सोमवार सकाळी मिळाला. त्यानंतर तातडीने सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि विमानतळाची तपासणी केली गेली. तपासणीत काहीही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, विमानतळावरील सुरक्ष वाढवण्यात आलेली असून हाय अलर्टचे आदेश दिले आहेत -आबीद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक. नागपूर विमानतळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज