Hamburg Airport : जर्मनीतील विमानतळावर गोळीबार, जळत्या बाटल्या फेकल्या; उड्डाणे रद्द

Hamburg Airport : जर्मनीतील विमानतळावर गोळीबार, जळत्या बाटल्या फेकल्या; उड्डाणे रद्द

Hamburg Airport : जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीने गोळीबार (Hamburg Airport) करत चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे खबरदारी घेत विमानतळ व्यवस्थापनाने सर्वच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीने एकापाठोपाठ एक दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे विमानतळावरील प्रवाशांत घबराट निर्माण झाली. पळापळ झाली. चेंगराचेंगरीही झाली. शनिवारी संध्याकाळी उशीरा एक व्यक्ती बॅरियरमधून कारने हॅम्बर्ग विमानतळाच्या मैदानात आला. त्यानंतर येथे त्याने दोनदा गोळीबार केला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच विमानतळाला वेढा घातला. त्यानंतर पोलिसांनी या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की ज्या प्रवाशांना या घटनेचा फटका बसला आहे ते थेट एअरलाइन्सशी संपर्क साधू शकतात. या घटनेनंतर पोलीस दलाने विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Pakistan : पाकिस्तानात मोठा हल्ला! हवाई तळात दहशतवाद्यांची घुसखोरी, गोळीबार सुरू

या घटनेनंतर नागरिकांत दहशत निर्माण झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की या व्यक्तीने गोळीबार तर केलाच शिवाय दोन पेटत्या बाटल्याही येथे फेकल्या होत्या. पोलिसांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावरही दिली. हल्लेखोराच्या कारच्या आत काही लोकांना ओलीस ठेवल्याचा विश्वास असल्याने आता पोलीस या प्रकरणात मोठी कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube