माजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीचं नाव मतदार यादीतून गायब; चौकशीची मागणी!

माजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीचं नाव मतदार यादीतून गायब; चौकशीची मागणी!

Marshal Pradeep Vasant Naik : राज्यात आज चौथ्या टप्यांतील 11 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. 11 लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघात काही मतदारांची नावे गायब असल्याचं दिसून आलं. अशातच आता माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक (Marshal Pradeep Vasant Naik) यांच्या पत्नी मधुबाला (Madhubala) यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी आश्चर्य व्यक्त करीत चौकशीची मागणी केलीयं. (ex air force chief Pradeep Vasant Naik votes in pune but wifes name missing from Voting list)

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नाईक यांनी सहकुटुंब पुण्यातील बाणेर रोड परिसरातील सॅम्पलिंग स्कूल मतदान केंद्रात मतदान केलं. यावेळी त्यांचा मुलगा आणि पत्नीसोबत होती. मात्र, मतदान यादीतून पत्नी मधुबाला नाव गायब असल्याने पत्नीला मतदानापासून वंचित रहावं लागलंय. तर स्वत: नाईक आणि मुलगा विनीत नाईक यांनी मतदान केलंय.

सुषमा अंधारेंचा बाळासाहेबांबाबतचा जुना ‘तो’ व्हिडिओ लावत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले !

नाईक यांनी आणि मुलाने मतदान केल्यानंतर पत्नीच नाव मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलंय. मी आणि माझा मुलगा मतदान करू शकलो पण, माझ्या पत्नीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. आम्ही मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तेव्हा मदत करण्यासाठी ते काहीही करू शकत नसल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय.

तसेच पत्नीचं नाव मतदार यादीत नसल्याने आम्ही निराश झालो असून यादीत अशा अनेक लोकांची नावे हटवण्यात लक्षात आल्याचं समोर आलंय. मतदारांची नावे अशी डिलीट का होत आहेत? हे शोधून काढले पाहिजे, असंही नाईक म्हणाले आहेत.

“आम्ही मतदान केंद्रावर पोहोचलो तेव्हा आमच्याकडे स्थानिक नगरसेवकाने दिलेल्या आवश्यक स्लिप होत्या. पण माझ्या पत्नीचे नाव यादीत नसल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असे माजी आयएएफ प्रमुख म्हणाले.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube