मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार

मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार

Pune Lok Sabha Bypoll : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रशासनाने देखील हालचाली सुरु केल्या आहे. तसेच मतदानासाठी मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा कसबा – चिंचवडनंतर पुण्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

प्रशासनाने दिले महत्वाचे आदेश
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी / पर्यवेक्षक यांना आदेशित करणेत येते की, गिरीश बापट यांचे निधनाने रिक्‍त झालेल्या जागी लोकसभा पोट निवडणूक २०२३ जाहिर होण्याची शक्‍यता आहे. यास्तव सर्व नोडल अधिकारी यांनी आपले यादी भागातील मतदान केंद्रावर तात्काळ भेट देऊन सदर मतदान केंद्राचे अक्षांश रेखांशासह फोटो काढावेत. तसेच सदर मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहेत किंवा नाही याची खात्री करावी. सदर मतदान केंद्रावर सर्व सुविधा आहेत किंवा नाही याबाबत लेखी अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा. अशा सूचना जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. संभाव्य पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांतून इच्छुकांची बहुगर्दी आहे. परंतू, कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे इथेही असेच वातावरण पाहायला मिळणार का? तसेच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध मविआ अशी लढत होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवले…बारामतीत गुन्हा दाखल

भावी खासदार म्हणून झळकले होते इच्छुकांचे पोस्टर
गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला काही तशी झाले नव्हते तोच पुण्यात एक वेगळाच प्रकार घडल्याचे देखील समोर आले होते. पुण्याचा भावी खासदार म्हणून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचे पोस्टर्स शहरात झळकले होते. हे पोस्टर्स भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही पोस्टर पुण्याचे ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत पक्ष कार्यालयासमोर लागले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube