live now
LIVE BLOG : मुंबई पुण्यासह राज्यभर पावसाचा हाह:कार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
Pune Rains : राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rains) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rainfall) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तसेच नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
अजित पवार यांची पूरपरिस्थिती दरम्यान पुण्यात पत्रकार परिषद
काल रात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. या पावसामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
-
पुण्यात पावसाचा हाह:कार; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ग्राउंड रिपोर्ट
Pune Collector Press Conferance on Pune Rain : : पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान (Pune Heavy Rains) घातले आहे. पावसाने शहराची दैना उडाली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी परिस्थितीचा घेतलाला आढावा मांडला. तसेच नागरिकांना खबरदारी पाळण्याचे आवाहन केले आहे.
-
अजित पवारांकडून पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा
पुणे आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुण्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा घेतला.
Have been taking stock of the heavy rainfall situation in various districts of Maharashtra, especially Mumbai, Pune, Thane, Kohlapur and Sangli since early morning from my office.
The concerned officials from Disaster Management System and District Administration have been… pic.twitter.com/q4aLiT3J0N
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024
-
सांगली-कोल्हापूरसाठी सतेज पाटील मैदानात; कर्नाटकच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
कर्नाटकमधील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग झाला नाही. तर राज्यातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती उद्भवते. या अगोदर अशी आपत्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे यावेळी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाणी सोडावे यासाठी सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे.
-
मुंबईकरांना दिलासा! 10 टक्के पाणी कपात मागे...
- ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींसह महानगराच्या पाणीपुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपात सोमवार 29 जुलै पासून मागे
- दमदार पावसाने महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर चार जलाशयांच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ
-
पुण्यात पावसाचा कहर, पर्यटन स्थळं 24 तासांसाठी बंद!
- महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पाण्याखाली.
- एकता नगरी सिंहगड रोड, निंबजनगर परिसर, पिंपरी चिंचवड, आकुर्डी, कुंदननगरमध्ये सोसायट्यांमध्ये शिरले पाणी. नागरिकांना खाद्य पदार्थ आणि पाणी देत मदत आणि बचाव कार्य सुरू.
- भिडे पूला शेजारी पूलाचीवाडी येथे विजेचा शॉक लागून3 तरूणांचा मृत्यू.
- मुळशीच्या लवासा रोडवर, लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर, भिमाशंकर-खेड रोड, वेल्ह्यातील वडघर येथे दरडी कोसळल्या. एनडीआरएफकडून बचाव कार्य.
-
विद्यार्थ्यांनो टेन्शन नको! बारावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार
बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी पुन्हा परीक्षा होणार !
महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकणार नाहीत, ही अडचण आपण…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 25, 2024
-
Pune Rain Update : तुफान पाऊस अन् पाण्यात अडकली गाडी..
Pune Rain Update: तुफान पाऊस अन् पाण्यात गाडी अडकली... | Pune News | LetsUpp Marathi |
.
पुणे महापालिकेजवळ पाण्यामुळे गाडी अडकल्याचं पाहायला मिळालं.
.
.#Pune #Punekar #PuneNews #PuneRains #Rain #RainUpdate #weather #WeatherUpdate #LetsUppMarathi #MarathiNews #PuneNewsUpdate pic.twitter.com/GHeJHYofBm— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2024
-
Pune Rains : सिंहगड रस्त्यावर एनडीआरएफची दोन पथके कार्यरत: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
सिंहगड रस्त्यावर NDRF ची दोन पथके कार्यरत !
मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यालगतच्या नदीपात्रातील सोसायट्यांमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी NDRF ची दोन पथके कार्यरत आहेत.
नागरिकांना माझी विनंती आहे, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 25, 2024
-
पुण्याला पाण्याचा विळखा, मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढला
पुण्यातील जोरदार पावसामुळे शहराला पाण्याचा विळखा पडला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. पुण्यातील मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-
मुसळधार पावसामुळे पुण्यात 38 ठिकाणी झाडे कोसळली
पुणे शहर आणि जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने अजूनही उघडीप दिलेली नाही. या पावसामुळे शहराची दैना उडाली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार सुरूच आहे. या पावसामुळे 38 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कुणीही नागरिक जखमी झाले नाही.
-
पावसाचा जोर, ओंकारेश्वर मंदिर निम्म्याहून अधिक पाण्यात
पुण्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाने शहराची दैना उडाली असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. शहरातील ओंकारेश्वर मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे.
-
जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता संपल्याने शहरात पाणी साचलं : अजित पवार
पुण्यात पाऊस सुरुच राहणार आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आता जमीन ओली आहे. शहरात पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नद्याही ओव्हर फ्लो झाल्या आहेत. रातोरात धरणाचं पाणी सोडण्याऐवजी रात्री सोडण्याचा प्रयत्न केला. पुण्यात सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाचं पाणी नदीत येत आहे. नदीचं पाणी आणि ओढ्यांतून येणाऱ्या पाण्यामुळे शहरात पाणी साचलं आहे, असे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
-
VIDEO : पुण्यातील कात्रज येथील पेशवे तलाव पूल पाण्यात, रस्ताही बंद
कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत आहे.रस्ता बंद करण्यात आला. तसेच या ठिकाणी पाटबंधारे मार्फत तलावाचे पाणी अडवण्यासाठी असलेली पूर्णपणे खोलण्यात आलीये.त्यामुळे कात्रज नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय ओढा येथूनआंबीलओढ्यामध्ये पाणी पुढे जात आहे. #PuneRains pic.twitter.com/A90RXobIWN
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2024
-
पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना, हवामान विभागाचा रेड अलर्ट
Pune Rains Update: पुणे शहर आणि परिसरासाठी हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट | Pune Red Alert |
.
.#Pune #Punekar #PuneNews #PuneRains #Rain #RainUpdate #weather #WeatherUpdate #LetsUppMarathi #MarathiNews #PuneNewsUpdate #LetsUppNews #marathibatmya pic.twitter.com/KFHDLqckei— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2024
-
पुण्यात जोरधार, मागील 24 तासांतील आकडेवारी घ्या जाणून..
Pune Rain Update: पुण्यामध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला. त्याची विभागनिहाय आकडेवारी समोर आली आहे... | Pune News | Punekar | Pune Rains |
.#Pune #Punekar #PuneNews #PuneRains #Rain #RainUpdate #weather #WeatherUpdate #LetsUppMarathi #MarathiNews #PuneNewsUpdate pic.twitter.com/xzYV9HtIiy— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2024
-
पुणेकरांनो घाबरू नका, वेळ पडल्यास नागरिकांना एअर लिफ्ट करू : मुख्यमंत्री शिंदे
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत. लष्कर पोहोचत आहे. वेळ पडल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
धक्कादायक! विजेचा शॉक बसून तिघांचा मृत्यू
अतिमुसळधार पावसात पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ही घटना घडली. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.