अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
यंदा राज्यात लवकरच पावासाला सुरूवात झाली आहे. पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी.