मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस धो धो पाऊस

मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस धो धो पाऊस

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून बहुतेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर आता आजपासुन पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच हवामान विभागाकडून पुढील दोन- तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड (Red Alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील दोन- तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच बुधवारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे उद्या 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे 20 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Airtel Down: मोठी बातमी, अनेक शहरांमध्ये एअरटेल सेवा बंद

तर रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube