SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली, आजपासून परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार

  • Written By: Published:
SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली, आजपासून परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार

Maharashtra Board Class 10 Admit Card 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचे (10th Board Exam) प्रवेशपत्र (Admit Card) विद्यार्थ्यांना आजपासून (ता. ३१ जानेवारी) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांसोबत हे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. त्यामुळे आजपासून उपलब्ध असलेले हॉल तिकीट वेळीच ताब्यात घेऊन त्यावर छापलेले तपशील अचूक आहेत की, नाही हे तपासून पाहणं आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले की, इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्रे मिळतील.

भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, CM शिंदेंचे आमदार आक्रमक; महायुतीत धुसफूस 

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा राज्य मंडळातर्फे १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात असेल. सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत ही परीक्षा असणार आहे. तर दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून सूर होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना आज ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या परिक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पध्दतीने मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकतेस्थळावर बुधवारपासून स्कूल लॉगिनमध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

आरोग्य विभागात 1729 पदांची भरती, महिन्याला 1 लाख 77 हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतं अर्ज? 

सर्व विभागीय मंडळांच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांना इयत्ता 10वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे त्यांना प्रिंट करून द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देतांना विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क आकारले जाऊ नये. संबंधित प्रवेशपत्राची प्रिंटआउट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा सही शिक्का प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना द्यावीत.

तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रातील विषय व माध्यमात बदल असल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन दुरुस्त्या करून घ्याव्यात. तसेच प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण याबाबतच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी आपापल्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी.

छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास, माध्यमिक शाळांनी पुनर्मुद्रण करून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे, अशा सूचना ओक यांनी दिल्या.

हॉल तिकीट डाऊनलोड कसं कराल?
10वी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवर “Login for Institute” वर क्लिक करा.
दहावीसाठी, ‘एसएससी’ आणि ‘एचएससी’ पर्यायांमधून ‘एसएससी’ पर्याय निवडा.
आता आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
त्यानंतर हॉल तिकिटे डाउनलोड होईल.

या वर्षीपासून ‘हे’ बदल
बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार परीक्षेची वेळ दहा मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. म्हणजेच सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागेल. तसेच दुपारी 3 वाजता परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना दुपारी 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागेल, अशी माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे. CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. CBSE बोर्ड यापुढे विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही. तसेच ग्रेडही देणार नाही. विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube