दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सीबीएसईने बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…

सीबीएसई बोर्डाने यंदाच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असेल.

CBSE Boards Changes Rule

CBSE Boards Changes Class 10th And 12th Exam Rule : सीबीएसई बोर्डाने यंदाच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असेल. अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची परवानगीच मिळणार नाही.

अंतर्गत मूल्यांकनाची सक्ती

सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की, इंटरनल असेसमेंट (CBSE Boards) हा आता परीक्षेचा अधिकृत भाग असेल. विद्यार्थी (Student) नियमित शाळेत हजर नसतील, तर त्यांचे अंतर्गत गुणांकन केले जाणार नाही. अशा वेळी त्यांच्या निकालावर तात्पुरती बंदी ( Class 10th And 12th Exam) घालण्यात येईल.

अनुपस्थित विद्यार्थ्यांना मोठा फटका

जर एखाद्या विद्यार्थ्याने शाळेत न जाता थेट परीक्षा फॉर्म भरला, तर त्याला ‘अत्यावश्यक पुनरावृत्ती’ (Compulsory Repeat Category) मध्ये टाकले जाईल. म्हणजेच त्याला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि चालू वर्षाचा निकाल थांबवला जाईल.

विषय निवडीसंदर्भातील नियम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 विषय बंधनकारक आहेत, तर जास्तीत जास्त 2 अतिरिक्त विषय निवडता येतील. बारावीच्या विद्यार्थ्यांना फक्त 1 अतिरिक्त विषय घेण्याची मुभा असेल. हे अतिरिक्त विषय संबंधित वर्गाच्या मागील वर्षातच ठरवावे लागतील. म्हणजेच दहावीसाठी नववीत, आणि बारावीसाठी अकरावीतच विषय ठरवणे बंधनकारक असेल.

प्रायव्हेट विद्यार्थ्यांसाठी सवलत

प्रायव्हेट कॅंडिडेट्सना कोणत्याही शाळेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. ते स्वतंत्रपणे अभ्यास करून परीक्षा देऊ शकतात.

सुविधा नसलेल्या शाळांसाठी बंधनं

ज्या शाळांकडे प्रयोगशाळा किंवा इतर आवश्यक सुविधा नाहीत, त्या शाळांना अतिरिक्त विषय देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

follow us