ब्रेकिंग ! आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

CBSE On Class 10th Exams : 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने मान्यता दिली

CBSE On Class 10th Exams

CBSE On Class 10th Exams : 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने (CBSE) मान्यता दिली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज (Sanyam Bhardwaj) यांनी दिली आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असणार आहे तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.

तर पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परिक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागणार असल्याची देखील माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तर अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच होणार असल्याची माहिती देखील सीबीएसईकडून देण्यात आली आहे.

सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मेमध्ये होणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असेल तर त्याला दुसऱ्या टप्प्यात बसून चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) शिफारस केलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज मान्यता दिली आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा आता विद्यार्थ्यांना होणार आहे.

मतांची चोरी करून मुख्यमंत्री फडणवीस जिंकले; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

follow us