सीबीएसईच्या पुस्तकात डेंटिंग, रोमान्सचे धडे…; 9 वीचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल

  • Written By: Published:
सीबीएसईच्या पुस्तकात डेंटिंग, रोमान्सचे धडे…; 9 वीचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल

Chapter On Dating And Relationships CBSE Book : किशोरवयीन काळात मुलांमध्ये आकर्षण वाढीस लागते. आपल्या भावना ते पालकांशी शेअर करू शकत नाही. परिणामी, मुलांमध्ये विकृती तयार होऊ शकते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान (CBSE) स्तुत्य पाऊल उचलले आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मूल्य शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये (CBSE Book) किशोरवयीन नातेसंबंधातील गुंतागुंत दूर करण्यासाठी धड्यांचा समावेश केला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय 

किशोरवयीन मुलांसाठी क्रश, फर्स्ट लव्ह किंवा रोमान्स हे खूप गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक असते. शिवाय, किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांसोबत क्रश किंवा प्रेमाबद्दल बोलायला कचरतात. त्यामुळं ही मुलं इंटरनेट किंवा त्यांच्या मित्रांचा सल्ला घेतात. पण, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती किंवा त्यांच्या वयाच्या मुलांनी दिलेला सल्ला नुकसानकारक असू शकतो. त्यामुळं किशोरवयीन मुलांना हेल्दी नाती किंवा वाईट नात्यांबाबत समज असाया हवी. यासाठी त्यांचं समुपदेशन व्हायलं हवं. याच हेतूने सीबीएसई बोर्डाच्या नववीच्या पुस्तकात या विषयावरील एका प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकातील या धड्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नगर-बीड-परळी-वैजनाथ रेल्वे मार्गासाठी २७५ कोटींची तरतूद, सुजय विखेंची माहिती 

CBSE बोर्डाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत नवीन पुस्तके सादर केली आहेत. यातील अभ्यास डेटिंग, नातेसंबंध आणि प्रेम यावर पूर्णपणे प्रकाश टाकतो. हा अभ्यासक्रम नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर चर्चा करण्यासाठी समर्पित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना घोस्टिंग, कॅटफिशिंग, सायबर बुलिंग, डेटिंग यावर प्रकाश टाकला आहे. क्रश किंवा खास मैत्री या विषयावर साधी उदाहरणे दिली आहेत.

एकीकडे अशा धड्यांची काय गरज आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर बहुसंख्य लोकांनी या पुस्तकाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला आहे. अशा शिक्षणाची आजच्या काळात गरज असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, टिंडर इंडियानेही या धड्यांवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेतला आहे. एका युजरने या पुस्तकाची मागणी केली आहे. तसेच यात दिलेल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, असे म्हटले आहे. तर टिंडर इंडियाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की पुढील धडा ‘ब्रेकअपला कसे सामोरे जावे’ या विषयावर असायला हवा, असं म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या