‘CBSE’चे भूत मानगुटीवर; शिक्षण देता येत नसल्याने नैराश्य; लातूरमध्ये माय-लेकीने संपवलं जीवन

‘CBSE’चे भूत मानगुटीवर; शिक्षण देता येत नसल्याने नैराश्य; लातूरमध्ये माय-लेकीने संपवलं जीवन

CBSE Education Mother Daughter Suicide : आर्थिक परिस्थितीने अनेकांचं आयुष्य हिरावलय. आजच्या धावत्या आणि आधुनिक जगात कित्येकांना जगण्याचा संघर्ष मोठा कठीण झालाय. जगासोबत चालण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहतो की काय या भीतीचं भूत कायम मानगुटीवर बसून आहे. त्याच भीतीने आणि समाजातील आर्थिक असमतोलाने कित्येकांना मृत्यूच्या दारात उभं केलय. (Latur Pattern) याच संघर्षाला तोंड देताना हतबल झालेल्या एका मातेने आपल्या चिमुकीलीसह जिवन संपवल्याची दुर्दैवी, दुख:द आणि असंख्य प्रश्नांना जन्म घालणारी घटना लातूर जिल्ह्यच्या निलंगा तालुक्यातील माळेगावात घडलीय.

परिसरात मोठी हळहळ

आपल्या मुलांना सीबीएसई (CBSE) इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आपलं जीवन संपवल्याची ही घटना आहे. मायलेकीचा या कारणाने असा जिव गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जातीये. (CBSE Education) याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समिक्षा व्यंकट हालसे (५, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असं मयत मायलेकीचं नाव आहे.

परिस्थितीने ते शक्य होत नव्हतं शरद पवार अन् उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट घणाघात

माळेगावच्या व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा अशी लोक होती. त्यांना त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडं आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती मोठी नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. मात्र, परिस्थितीने ते शक्य होत नव्हतं.

उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त

भाग्यश्री आपल्या पतीकडे वारंवार याबाबत बोलत असतं. मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याबद्दल आग्रह करत असत. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असं म्हणायचे असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या होत्या. त्यांना सीबीएसईच्या शाळेत घालण्याबद्दल अपेक्षा होती पण ती हळू हळू पूर्ण होईल की नाही यांची चिंता सतावत होती. अखेर त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर जात आपल्या मुलीसह आत्महत्या केली.

शेवटचेच बोलणं तुम्ही मराठ्यांना फसवणार असाल तर तुमचा कार्यक्रम होणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक

या घटनेत मुलाचाही मृत्यू झाला असता. मात्र, तो बचावला. कारण भाग्यश्री हालसे या घराबाहेर जात असताना त्यांनी मुलगा समर्थलाही हाताला आपल्यासोबत घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. परंतु, समर्थ खेळण्यासाठी जायचंय म्हणत आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावल्याचं नातेवाईक सांगित आहेत. भाग्यश्री यांनी पतीस व्हिडिओ कॉल केला. परंतु, इंटरनेट बंद असल्याने समजलं नाही. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि आईसोबत आले पप्पा, असं मुलगी म्हणाली. ते शेवटचेच बोलणं झाल्याचं वडील व्यंकट यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube