हिरकणी कक्षासाठी आवाज उठविणार… बाळासह आमदार मुदंडा अधिवेशनात

हिरकणी कक्षासाठी आवाज उठविणार… बाळासह आमदार मुदंडा अधिवेशनात

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आणि महिला दिनाच्या निमित्ताने भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी दोन महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन विधान भवनात हजेरी लावली. महिला वर्ग ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आवाज उठवणार असल्याचे आमदार मुंदडा म्हणाल्या.

अहमदनगर जिल्हा बँकेत पुन्हा पिसाळ पॅटर्न; पालकमंत्री विखेंची ताकद वाढली…

पहिल्यांदाच दोन महिन्याच्या बाळाला घेऊन विधीमंडळाच्या अधिवेशनाला आले आहे. बाळाला सोबत घेऊन अधिवेशनात मला प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाल्याच आनंद असल्याची प्रतिक्रिया आमदार नमिता मुदंडा यांनी दिली आहे. त्यासोबतच हिरकणी कक्षाची स्थापना करुन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुदंडा यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आभार मानले आहेत.

राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप… काय म्हणतंय हवामान खातं, वाचा

आमदार मुदंडा म्हणाल्या, मला 2020 मध्ये मुलगी झाली होती. त्यावेळी अधिवेशनामध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली नव्हती. म्हणून तेव्हा मी बाळाला घेऊन येऊ शकली नाही. आता माझ्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन मी विधीमंडळात आले आहे. हिरकणी कक्षाची स्थापना केल्याचा मला आनंद असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Uddhav Thackeray : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधिमंडळात

यावेळी बोलताना आज महिला दिनानिमित्त त्यांनी राज्यातील महिलांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आमदार मुदंडा म्हणाल्या आज अधिवेशामध्ये महिला दिनानिमित्त महिलांसाठी लक्षवेधी राखून ठेवल्याचा मला आनंद आहे. ही परंपरा अशीच कायम राहु द्यावी. फक्त महिला दिनानिमित्तच नाहीतर इतर दिवशीही अधिवेशनात एक दोन दिवस महिलांसाठी राखीव ठेवले पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.

तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी मी हिरकणी कक्षासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी मी सर्वच महिला आमदारांसाठी हिरकणी कक्ष असावं अशी मागणी केली होती. अगोदर हिरकणी कक्षात काही सुविधा नव्हत्या ते चुकीचंच आहे. दुसऱ्या दिवशी मात्र, हिरकणी कक्षामध्ये बेड, खेळणी, फ्रिज, पूर्णवेळासाठी नर्सची सुविधा केली आहे. पुढाकार घेऊन हे हिरकणी कक्षाचं काम केल्याचा मला आनंद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आमदार सरोज अहिरे यांना देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हिरकणी कक्षाच्या अवस्थेबद्दल आवाज उठविला होता. हिरकणी कक्षाची दुरावस्थेबाबत त्यांनी थेट आरोप केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच हिरकणी कक्षामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल

दरम्यान, हिरकणी कक्षाबाबत माझाच प्रश्न नसून राज्यातील सरकारी खात्यातील महिलांसाठीही अद्याप ही सुविधा उपलब्ध नसून याबाबत लक्षवेधीमध्ये मागणी करणार असल्याचं आश्वासन आमदार मुदंडा यांनी दिलं आहे. तसेच महिला आमदारांच्या 2-3 वर्षांच्या मुलांसाठी खेळण्यासाठी परिसर पाहिजे, अशी मागणीही करणार असल्याचं आमदार मुदंडा म्हणाल्या आहेत.

हा प्रश्न केव्हा माझा नसून कोणत्याही क्षेत्रात महिला काम करतात, त्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात यायला हवे. शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष उभारण्याची गरज आहे. मंत्रालयात देखील कित्येक महिला काम करतात, त्या ठिकाणी देखील हिरकणी कक्ष असायला हवे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube