मोठी बातमी! 2026 पासून वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्ड परीक्षा

  • Written By: Published:
मोठी बातमी! 2026 पासून वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्ड परीक्षा

CBSE Exams: सीबीएसईने 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा (10th Board Exams) घेण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्याला सीबीएसईने (CBSE) मान्यता देखील दिली आहे. सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये तर दुसरा टप्पा मे 2026 मध्ये होईल.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, जर विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात सर्व विषय उत्तीर्ण केले. पण तरीही, जर त्याला हवे असेल तर तो सुधारणेसाठी पुन्हा परीक्षा देऊ शकतो. तसेच जर एखादा विद्यार्थी पहिल्या वेळी नापास झाला तर तो दुसऱ्यांदा परीक्षेला बसू शकतो. याच बरोबर दोन्ही राऊंडनंतर 5 विषयांमधील सर्वोत्तम गुणांची निवड करण्यात येईल. परीक्षेचा पहिला टप्पा मार्च 2026 मध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये असणार आहे. याबाबात सीबीएसईने 9 मार्चपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत, विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी दिली जात आहे. माहितीनुसार, पहिली बोर्ड परीक्षा 2026 मध्ये 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान होऊ शकते, दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान होऊ शकते.

प्रैक्टिकल परीक्षा एकदाच होणार

याबाबत बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही परीक्षा अभ्यासक्रमानुसार काटेकोरपणे घेतल्या जातील आणि दोन्ही टप्प्यांसाठी उमेदवारांना समान परीक्षा केंद्रे दिली जातील. अर्ज करताना दोन्ही परीक्षांचे परीक्षा शुल्क वाढवले ​​जाईल. नवीन नियमांनुसार, बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, तर प्रैक्टिकल आणि अंतर्गत मूल्यांकन वर्षातून फक्त एकदाच घेतले जातील.

144 लावा नाहीतर 145, जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्ड परीक्षांचा पहिला आणि दुसरा टप्पा देखील पूरक परीक्षा म्हणून काम करेल आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विशेष परीक्षा घेतल्या जाणार नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube