Jay Shah : गुजरात क्रिकेट ते ICC चा तरुण अध्यक्ष; जय शाहांची मैदानाबाहेरची खास स्टोरी..

Jay Shah : गुजरात क्रिकेट ते ICC चा तरुण अध्यक्ष; जय शाहांची मैदानाबाहेरची खास स्टोरी..

Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता (Jay Shah) थेट आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. आयसीसीचे अध्यक्ष (ICC President) म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या 1 डिसेंबर पासून जय शाह अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. 35 वर्षीय जय शाह ग्रेग बार्कले यांची जागा घेणार आहेत. क्रिकेट प्रशासनात जय शाह यांची एन्ट्री आणि प्रमुख पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा राहिला याची माहिती जाणून घेऊ या.

जय शाह यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवेश सन 2009 मध्ये झाला. यावेळी त्यांनी अहमदाबादच्या सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट बरोबर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी सर्वात आधी गुजरात क्रिकेट असोसिएशनबरोबर (GCA) एक एक्झिक्युटिव्ह म्हणून राज्यभरात काम केलं. त्यानंतर 2011 मध्ये त्यांना बीसीसीआयच्या मार्केटिंग (BCCI) कमिटीमध्ये सहभागी करून घेण्यात आले.

जय शाह 25 वर्षांचे असतानाच 2013 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी पोहोचले होते. त्यांनी बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले होते. सन 2015 मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून हटवण्यापाठीमागे जय शाह यांनी पडद्यामागून हालचाली केल्या होत्या असेही सांगितले जाते. त्यांनी अनुराग ठाकूर यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी सचिवपदाच्या निवडणुकीत श्रीनिवासन यांचे उमेदवार संजय पटेल यांचा एका मताने पराभव केला होता.

Jay Shah : जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव ? ‘या’ नावांची चर्चा

जय शाह यांच्या क्रिकेट प्रशासनातील कारकिर्दीची सुरुवात गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून झाली असे म्हणता येईल. सन 2013 मध्ये संयुक्त सचिवपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर येथील मोटेरा स्टेडियमचा चेहरामोहरा बदलण्यात जय शाह यांनीच पुढाकार घेतला होता. घोषणा झाल्यानंतर या स्टेडियमला जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून संबोधले गेले. 2020 मध्ये या स्टेडियम मध्येच नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2021 मध्ये या ठिकाणी पाहिला कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. नंतर या स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) असं करण्यात आलं.

2019 : बीसीसीआय सचिव

सन 2019 मध्ये जय शाह यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सचिवपदी प्रमोशन मिळालं. त्यावेळी सौरभ गांगुलीच्या (Saurav Ganguly) अध्यक्षपदाच्या नियुक्तीची मोठी चर्चा झाली होती. पण जय शाह यांनी मात्र शांतपणे आपलं काम चालू ठेवलं होतं. पुढे 2022 मध्ये सुद्धा जय शाह यांना बिनविरोध निवडण्यात आले. तर सौरभ गांगुलीने रॉजर बिन्नी यांच्यासाठी रस्ता मोकळा केला.

कोरोना काळात आयपीएल

कोरोना संकटाच्या (Covid 19) काळात अवघं जगच ठप्प पडल होतं. या काळात एखादी क्रीडा स्पर्धा आयोजित करणे म्हणजे मोठ्या धाडसाचं काम होतं. या काळात आयपीएल (IPL) स्पर्धा बंद पडणार नाही याची काळजी जय शाह यांनी घेतली. 2020 मधील आयपीएल स्पर्धा युएईमध्ये एका बायो सेक्युर बबलमध्ये खेळवण्यात आल्या होत्या. 2021 मध्ये आयपीएल भारतात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या लाटेमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. नंतर वर्षाच्या शेवटी उर्वरित स्पर्धा युएई (UAE) मध्ये घेण्यात आल्या.

BCCI कडून मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड

शहांचे महत्त्वाचे निर्णय

सप्टेंबर 2021 मध्ये जय शाह यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला. डायनॅमिक मॉडेलनुसार एक क्रिकेटर ज्याने त्याच्या कारकीर्दीत 40 पेक्षा जास्त सामने खेळले असतील त्याला प्रति दिवस 60 हजार रुपये मॅच फी मिळेल. यानंतर 2024 च्या सुरुवातीला जय शाह यांनी आणखी एक नवीन योजना सुरू केली. जर एखादा खेळाडू एका सीझनमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त सामने खेळला असेल तर त्याला 15 लाख रुपये टेस्ट मॅच फी व्यतिरिक्त प्रति टेस्ट मॅच 45 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. कोरोना संकटाच्या काळात देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे उत्पन्न कमालीचे घटले होते त्यांच्यासाठी हा दिलासा देणारा निर्णय बोर्डाने घेतला होता.

2021 : एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष

जय शाह यांना एशियन क्रिकेट काऊन्सिलचे (Asian Cricket Council) अध्यक्ष करण्यात आले होते. सर्वात कमी वयाचे अध्यक्ष म्हणून जय शाह यांनी काम पाहिले होते. यानंतर 2022 मध्ये जय शाह आयसीसी मध्ये वित्त आणि वाणिज्य समितीचे अध्यक्ष बनले. BCCI मध्ये जय शाह यांच्या कार्यकाळात पाच वर्षांसाठी 48 हजार 390 कोटी रुपयांचे आयपीएल मीडिया राईट्ससाठी रेकॉर्ड ब्रेक व्यवहार झाले.

2022-23 : WPL स्पर्धेला ग्रीन सिग्नल

बीसीसीआयने महिला खेळाडूंना सुद्धा पुरुष खेळाडूंप्रमाणेच समान मॅच फी देण्याचा निर्णय घेतला. 2023 च्या सुरुवातीला महिला प्रीमियर लीग (WPL) एक वास्तव बनले. या लीगने महिला क्रिकेट मध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. WPL ने आतापर्यंत दोन सत्र पूर्ण केले आहेत. जय शाह यांच्या कारकिर्दीत त्यांनी असे महत्वाचे निर्णय घेतले. मागील वर्षातील एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाला जिंकता आला नाही. ही सल त्यांच्या मनात होती. पण अमेरिकेत नुकत्याच झालेला टी 20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी भारताने केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube