IPL 2024 संपताच BCCI ची मोठी घोषणा, मैदानावर राबणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपये
IPL 2024 Final Highlights : IPL 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले. यानंतर बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी मोठी घोषणा करत ग्राउंड स्टाफ आणि पिच क्युरेटरसाठी बक्षीस जाहीर केले आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ग्राउंड स्टाफ आणि पिच क्युरेटरला तब्बल 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तिसऱ्यांदा IPL चे विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला बीसीसीआयने बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये दिले आहे तर उपविजेता सनरायझर्स हैदराबादला 12.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून बीसीसीआयकडून देण्यात आले आहे. तर आता बीसीसीआयकडून सर्व नियमित आयपीएल स्थळांचे ग्राउंडस्टाफ आणि खेळपट्टी क्युरेटर्सना लीग दरम्यान उत्कृष्ट खेळपट्ट्या बनवल्याबद्दल प्रत्येकी 25 लाख रुपये बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सवर माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या यशस्वी T20 सीझनचे अनसिंग हिरो हे ग्राउंड्समन आहेत, ज्यांनी खराब हवामानातही उत्तम खेळपट्ट्या तयार केल्या. यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून आयपीएलच्या 10 नियमित स्थळांवरील ग्राउंड्समन आणि पिच क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि तीन अतिरिक्त स्थळांवर खेळणाऱ्यांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा करत आहे. तुमच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद. असं जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुजय विखे बाजी मारणार पण लीड घटणार…, राम शिंदे असं का म्हणाले?
तर 26 मे रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत कोलकाता समोर 114 धावांचा लक्ष दिला होता. प्रत्युत्तरात कोलकाताने 10.3 षटकांत लक्ष्य गाठले.