सुजय विखे बाजी मारणार पण लीड घटणार…, राम शिंदे असं का म्हणाले?

सुजय विखे बाजी मारणार पण लीड घटणार…, राम शिंदे असं का म्हणाले?

Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून नगरचा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी निकालापूर्वी निवडणुकीवरती महत्त्वाचे भाष्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना अहमदनगरमधून सुजय विखे (Sujay Vikhe) हे निवडून येतील मात्र यंदाच्या वेळी त्यांचे मतधिक्य हे घटेल असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

याच बरोबर प्रचाराच्या वेळी अनेक अफवा पसरविले गेले तसेच अनेक सर्वे देखील झाले मात्र या सर्व सर्व्हेना चार जूनला उत्तर मिळेल असा विश्वास शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

लोकसभेचे निकालावरती बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणुकीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत अनेक कथाकथित सर्वे देखील झाले. करण्यात आलेल्या सर्वेचे रिपोर्ट जाहीर करण्यात येऊ नये असे असतानाही सर्वच्या रिपोर्ट हे बाहेर येत आहेत. मात्र असं असलं तरी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची नगर येथे झालेली सभा त्याला मिळालेला जन प्रतिसाद पाहता यावेळी पुन्हा एकदा विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे हे पुन्हा निश्चित विजयी होतील असा विश्वास विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक असो व शेतकरी या सर्वांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेले दहा वर्ष मिळालेल्या न्याय व सहकार्य या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून मतदारांकडून प्रत्यक्ष कृतीत उतरले असणार हे आम्हाला मोदींच्या सभेमध्ये व प्रचारादरम्यान जाणवले असे शिंदे म्हणाले. त्यामुळे सुजय विखे यांचा विजय निश्चित होणार याबाबत कुठलीही शंका असण्याचे काही कारण नाही असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.

…तर मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेणार का? पुणे कार अपघात प्रकरणात अंजली दमानियांची थेट मागणी

त्यामुळे अफवा पसरविणारे असो किंवा कथाकथित सर्वे करणारे या सर्वांना चार जुनला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही असं देखील राम शिंदे म्हणाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी मुख्य लढत सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात पाहायला मिळाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज