पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार का? ‘या’ दिवशी होणार मोठा निर्णय
Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील (Champions Trophy 2025) वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये (Pakistan) आयोजित करण्यात येणार आहे. मात्र अद्याप या स्पर्धेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला नाही. याचा मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यासाठी आयसीसीकडून (ICC) 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड माॅडेलवर आयोजित करण्यात यावे अशी मागणी बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याला सहमती दिली नसल्याने आयसीसी 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन बैठकीमध्ये या स्पर्धेच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे.
याबाबत माहिती देताना आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, चॅम्पियन ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी आयसीसी बोर्डाची 29 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. अशी माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Jai Shah) 1 डिसेंबर रोजी आसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. त्यापुर्वी होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
बंदूक घेऊन माझ्या छातीमध्ये गोळ्या घाला पण …, अजय बारस्करांचा जरांगे पाटलांवर घणाघात
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह 8 संघ सहभागी होणार आहे. आयसीसी वेळापत्रकानुसार ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. मात्र पाकिस्तान आणि बीसीसीआय यांच्यातील वादामुळे या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीमध्ये हायब्रीड माॅडेलवर देखील चर्चा होणार आहे. भारतीय संघाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.