टीम इंडियातून गौतम गंभीरची होणार ‘सुट्टी’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये ?
Gautam Gambhir : भारतीय संघाने तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआयकडून (BCCI) हेड कोच गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा 0-3 असा पराभव झाला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
माईखेलच्या वृत्तानुसार बीसीसीआय आता फक्त वनडे आणि टी-20 मध्ये गौतम गंभीरकडे हेड कोचची जबाबादारी देण्याचा विचार करत आहे. तर कसोटी क्रिकेटसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे (VVS Laxman) जबाबदारी देण्याची तयारी बीसीसीआय करत आहे. माहितीनुसार, बीसीसीआयने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपर्यंत (Border Gavaskar Trophy) कसोटी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे. जर भारतीय संघ बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी जिंकू शकला नाहीतर गौतम गंभीरला कसोटी संघाचे प्रशिक्षकपद गमवावे लागेल. अशी माहिती समोर येत आहे.
बीसीसीआय नाराज
माहितीनुसार, गौतम गंभीर यांच्या सांगण्यावरून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिरकीला अनुकूल विकेट्स बीसीसीआयकडून तयार करण्यात आली होती. मात्र त्याच विकेट्सवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्यामुळे आता बीसीसीआय गौतम गंभीरवर कारवाई करण्याचा विचार करत आहे.
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला
बीसीसीआयनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गौतम गंभीर भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकण्यात मदत करू शकला नाही, तर बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवू शकते. तर गौतम गंभीरकडे वनडे आणि टी-20 ची जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.