टीम इंडियाचा हेड कोच बदलणार, ‘व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण सांभाळणार जबाबदारी, ‘हे’ आहे कारण
IND vs SA T20I: पुढील महिन्यात भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) दौरा करणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 8 नोव्हेंबरपासून होणार आहे.
तर आता भारतीय संघाच्या या दौऱ्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, या मालिकेसाठी हेड कोच गौतम गंभीर भारतीय संघासोबत नसणार आहे. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) भारतीय संघाच्या हेड कोचची जबाबदारी पार पडणार आहे. तर दुसरीकडे सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असणारी तीन कसोटी सामन्याची मालिका 5 नोव्हेंबरला संपणार आहे आणि दक्षिण आफ्रिकेसोबत पहिला टी-20 सामना 3 दिवसांनी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
याच बरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीर दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या या मालिकेसाठी उपल्बध नसणार आहे. गौतम गंभीर या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने बीसीसीआयने (BCCI) हेड कोचची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली आहे. भारतीय संघासाठी डब्लूटीसीच्या फायनलसाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी महत्वाची आहे. त्यामुळे हेड कोच गंभीर आणि त्याचे प्रशिक्षक कर्मचारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे आणि या ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ भारत अ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे आणि या सामन्यावर हेड कोच गौतम गंभीर बारीक लक्ष देणार आहे कारण या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे भारताचे प्लेइंग इलेव्हन ठरवले जाऊ शकते.
तमन्ना भाटिया पुन्हा चर्चेत, ‘आज की रात’ गाण्याचा पूर्ण व्हिडिओ रिलीज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार वैश, आवेश खान आणि यश दयाल.