मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला
Laxman Hake : नांदेडमधून (Nanded) एक मोठी बातमी समोर येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली आहे. माहितीनुसार, कंधार तालुक्यातील पाचोरा गावाजवळ लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली.
ओबीसी उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला असा आरोप हाके यांनी केला आहे. माझ्या गाडीवर 150 तरुणांनी हल्ला केला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. या प्रकरणात लक्ष्मण हाके उद्या 08 नोव्हेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
माहितीनुसार, लक्ष्मण हाके (Laxman Hake) मराठवाड्यात ओबीसी समाजाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते. कंधार तालुक्यातील पाचोरा गावातून जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी स्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत हल्लेखोरांना पकडण्यात येत नाही तोवर येथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
याबाबत माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही ओबीसी उमेदवाराच्या प्रचारार्थ येथे आलो असताना आमच्या गाडीवर तोंडावर पांढरे कपडे बांधून दीडशे तरुणांनी हल्ला केला. हा भ्याड हल्ला आहे. यावेळी हल्लेखोरांनी एक मराठा,लाख मराठा अशा घोषणा दिले अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणारच, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना धडकी भरवणारा दावा
तसेच आम्ही या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे आणि जो पर्यंत दोषींवर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत कंधार पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.