भारताला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश सिरीजमधून आऊट, ‘या’ दिवशी संघात परतणार

भारताला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश सिरीजमधून आऊट, ‘या’ दिवशी संघात परतणार

Mohammed Shami : बांगलादेश विरुद्ध (Ind Vs Ban) सुरु होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी मोहम्मद शमीबद्दल (Mohammed Shami) एक मोठी बातमी समोर आली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात होत होती मात्र आता मोहम्मद शमी बांगलादेश सिरीजमधून बाहेर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jai Shah) यांनी याबाबत एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. आमचा संघ आधीच चांगला तयार आहे. आम्ही काही काळ जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे तर मोहम्मद शमी देखील तेव्हापर्यंत पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये शमीची गरज आहे. असं बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले.

तर दुसरीकडे दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) शमी खेळताना दिसणार अशी देखील चर्चा सुरु होती मात्र शमीबाबत निवडकर्त्यांना जोखीम पत्करायची नाही त्यामुळे शमीची दुलीप ट्रॉफीमध्ये निवड करण्यात आलेली नाही. सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाचे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना तंदुरुस्त ठेवणे हे प्राधान्य आहे. शमीचा शेवटचा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे चषक फायनल होता. संपूर्ण विश्वचषकात शमीने 24 विकेट घेतल्या होत्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

मोहम्मद शमी रणजीमध्ये दिसणार?

माहितीनुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दिसू शकते. 11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश आणि 18 ऑक्टोबर रोजी बिहारविरुद्ध बंगालच्या पहिल्या दोन रणजी सामन्यांमध्ये शमी खेळू शकतो. त्यानतंर तो न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये तीन पैकी एक सामन्यात खेळू शकतो असं सांगण्यात येत आहे.

‘मोहब्बत की दुकान खोलने से कूछ नही होता…,’ कॉंग्रेसच्या झिशान सिद्दीकींचा राहुल गांधींना घरचा आहेर

न्यूझीलंड कसोटी सिरीज 19 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये सुरू होईल, त्यानंतर पुणे (24 ऑक्टोबर) आणि मुंबईत (1 नोव्हेंबर) कसोटी सामने होतील. ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शमी यापैकी एक सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube