भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु असताना इशान किशनवर मोठी जबाबदारी; बीसीसीआयने केली घोषणा

Duleep Trophy 2025 : भारत आणि इंग्लंडमध्ये (INDvsENG) ओव्हल येथे पाचवा कसोटी सामना सुरु असताना बीसीसीआयने भारताचा स्टार विकेटकीपर इशान किशनवर (Ishan Kishan) मोठी जबाबदारी टाकली आहे. नुकतंच बीसीसीआयने (BCCI) दुलीप ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत भारताने अनेक स्टार खेळाडू खेळणार आहे. या स्पर्धेत इशान किशानवर बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे.
इशान किशनला या स्पर्धेत ईस्ट झोनचा कर्णधार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इशान किशन भारतीय संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.
इशान किशनवर मोठी जबाबदारी
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दुलीप ट्रॉफी 2025 (Duleep Trophy 2025) 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून इशान किशन ईस्ट झोनचा कर्णधार असणार आहे. तर श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, शार्दुल ठाकूर वेस्ट झोनकडून खेळताना दिसणार आहे. इशान किशनने आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 60 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 3611 धावा केल्या आहेत. 8 शतकांव्यतिरिक्त, इशानने 19 अर्धशतके देखील केली आहेत. इशानसोबत दुलीप ट्रॉफीमध्ये झारखंडच्या 6 खेळाडूंना संधी मिळाली आहे.
🚨 ISHAN KISHAN – THE CAPTAIN OF EAST ZONE IN DULEEP TROPHY 🚨 pic.twitter.com/YY9AgY8FuY
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2025
ईस्ट झोन संघ
इशान किशन (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उप-कर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीषी, सूरज सिंधू जयस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू: मुख्तार हुसेन, आशीर्वाद स्वैन, वैभव सूर्यवंशी, स्वस्तिक सामल, सुदीप कुमार घरामी, राहुल सिंग.
वेस्ट झोन संघ : शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड़, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्र जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.