The Kerala Story चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये जलवा; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अन् सिनेमॅटोग्राफीचे पुरस्कार पटकावले

The Kerala Story : प्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांनी अनेक गाजलेल्या आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे द केरळा स्टोरी (The Kerala Story) , ज्याने प्रदर्शित होताच देशभरात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाची कथा वेगवान, प्रभावी आणि ठोस होती, परंतु ती हिंदुत्वाच्या “लव्ह जिहाद” या वादग्रस्त संकल्पनेवर आधारित असल्यामुळे चर्चेचा विषय बनली होती.
वाद असूनही, या चित्रपटाने देशभरातील प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. आता या चित्रपटाला मोठी मान्यता मिळाली आहे. द केरळा स्टोरीने 2023 मधील 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (71st National Film Awards 2023) दोन प्रमुख पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटासाठी प्रशांतनु मोहापात्रा यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला मिळणार
दरम्यान, विपुल अमृतलाल शाह आता त्यांच्या पुढच्या दिग्दर्शित चित्रपट हिसाबच्या तयारीत व्यस्त आहेत. ही एक हायस्ट थ्रिलर असून यात जयदीप अहलावत आणि शेफाली शाह प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सनशाईन पिक्चर्स आणि जिओ स्टुडिओज यांच्या बॅनरखाली बनलेली ही चित्रपट 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘12 वी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार