पोलीस कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! फौजदार होण्याचा मार्ग मोकळा; बंद केलेली विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

पोलीस कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! फौजदार होण्याचा मार्ग मोकळा; बंद केलेली विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

Maharashtra Police : राज्य सरकारने पोलीस दलाशी संबंधित एक मोठा (Maharashtra Police) निर्णय घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (Police Sub Inspector) खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती. आता मात्र ही परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे होतकरू, अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची संधी मिळेल. परीक्षेत पास झाल्यानंतर कर्मचारी थेट पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करील.

महायुती सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. पोलीस दलात खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. पाच वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पीएसआय पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत परीक्षा देता येत होती. परंतु, काही कारणास्तव फेब्रुवारी 2022 मध्ये शासन निर्णय काढून परीक्षा बंद करण्यात आली होती.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात होती. तसेच मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याकडूनही पाठपुरावा केला जात होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. राज्य सरकारने ही विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे पीएसआय होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

पोलीस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलीस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात नवीन चैतन्य निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली.

‘सावली’ डान्सबार, पोलिसांची कारवाई अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर अनिल परबांचा खळबळजनक आरोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube