‘सावली’ डान्सबार, पोलिसांची कारवाई अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर अनिल परबांचा खळबळजनक आरोप

‘सावली’ डान्सबार, पोलिसांची कारवाई अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर अनिल परबांचा खळबळजनक आरोप

Anil Parab On Yogesh Kadam : महाराष्ट्र विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनिल परब (Anil Parab) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.

विधान परिषदेमध्ये बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम (Jyoti Ramdas Kadam) यांच्या नावावर मुंबईतील कांदिवली परिसरातील सावली डान्सबार (Saavli Dance Bar) असल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी या डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकली होती आणि 22 बारबाला ताब्यात घेतले होते असं म्हणत राज्यात डान्सबारवर बंदी असताना देखील हा बार कसा सुरु आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला, 22 ग्राहकांना आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. बारचा पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. ज्योती रामदास कदम गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत. असं अनिल परब म्हणाले.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आय बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा. अजित दादा तुम्ही योग्य कारवाई कराल. जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल. असं देखील अनिल परब म्हणाले.

… तर जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का?

यावेळी अनिल परब यांनी जनसुरक्षा विधेयकांवरुन देखील राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अनिल परब म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. मात्र राज्यपाल यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन आमच्या पीएला खाली उतरवलं. आता राज्यपाल सुरक्षित नसेल तर काय उपयोग? जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? असं देखील अनिल परब म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज, विधानभवन राडा प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube