सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज, विधानभवन राडा प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज, विधानभवन राडा प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या मारहाणीनंतर आता या प्रकरणात राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता या प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर केली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.  राज्याच वाटोळं होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु
आहे. राज्यातील जनतेला या अधिवेशनात न्याय मिळाले नाही असं मला वाटते असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सत्तेच्या लालसेपोटी राजकारण्यांनी गुंडांना पक्षात घेतलं आहे. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले.

काल मारामारी केली ते कोण कडवे की डावे, डावे – उजवे कोण होते? त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. तर लोकशाहीचा खून करणारे विधीमंडळात वावरत आहेत. गुंडांना पक्षात घेऊन पदं देण्यात आली अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. याचबरोबर जर जण सुरक्षा विधेयक दहशतवादाविरोधात असेल तर आम्ही त्याला समर्थन करणार असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

तसेच राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा गैरसमज करुन घेऊ नका, पण राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करु देणार नाही असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube