विधानसभा हल्ला प्रकरण: आम्हाला आरोपी ठरवलं, गुन्हेगार मोकाट ; जितेंद्र आव्हाडांचा संताप

NCP Jitendra Awhad On Vidhan Bhavan Rada Allegations : विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावना त्यांनी व्यक्त केलीय. एक संतप्त आणि रोखठोक भूमिका घेतली आहे.
आम्हालाच गुन्हेगार ठरवून अटक?
माझ्या आणि जयंत पाटील यांच्या मनात आम्हाला फसवले गेले, अशी भावना आहे. प्रकार घडल्यानंतर जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यात स्पष्ट दिसते की, आमदारासोबत असलेले गुंड सभागृहात घुसतात आणि आमदाराला मारतात. त्यातले दोन जण ताब्यात घेतले जातात, नंतर मागे बसवले जातात. अध्यक्ष आणि सचिव म्हणतात, त्यांना सोडून द्या. त्यानंतर आम्हाला अटक झाल्याची माहिती मिळते. मी विचारलं का अटक (Gopichand Padalkar) केली, तर म्हणाले ‘आदेश आहे’. आम्ही काय आरोपी आहोत का? आम्हाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. मग आम्हालाच गुन्हेगार ठरवून अटक का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
टॅलेंटेड अर्थतज्ज्ञ, अमेरिका-यु्क्रेन डीलही घडवली.. युक्रेनच्या नव्या महिला पंतप्रधान कोण?
पडळकर गटाकडूनच हल्ल्याची सुरुवात
जितेंद्र आव्हाड यांनी पुढे सांगितलं की, “आरोपी कोण आहेत तर – गणेश विठ्ठल गुते (हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला), कृष्णा रासकर, लक्ष्मण जगदोंड आणि इतर मिळून पाच जण होते. त्यातले दोन ताब्यात घेतले, एकाला अटक केली. आम्ही पोलिसांना हेच विचारलं म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला शब्दही पाळला नाही. ज्यांनी इशारा केला, सुरुवात केली, त्यांच्यावर पोलीस काही कारवाई करणार आहेत की नाही, हेही विचारण्याजोगं आहे.
या घटनेच्या वेळी आपण तिथे नसल्याचे सांगताना आव्हाड म्हणाले की, मी तिथे असतो, तर शंभर टक्के सगळं बिल माझ्यावर फाडलं गेलं असतं. हे जे 5 जण गेले होते, ते मारायलाच गेले होते. बिचारा नितीन तिथे होता, मी हाती गवसलो नाही. तुमच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला आहे. मीडिया दाखवत आहे की त्यांनी सुरुवात केली होती, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
Awhad Vs Padalkar : विधिमंडळातील आव्हाड-पडळकर राड्यापूर्वी पोलिसांनी दिला होता अलर्ट
याशिवाय, वैयक्तिक हल्ल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी रोष व्यक्त केला.माझ्या मुलीबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दांत ट्विट केलं जातंय. तिच्या नवऱ्याबद्दलही अपमानकारक ट्विट्स झाले. आंतरधर्मीय विवाह केल्यावरूनही तिच्यावर निशाणा साधला जातोय. माझी मुलगी कशी आहे, हे मला फरक पडत नाही. पण हे लोक ज्या प्रकारे बोलतात, ते असह्य आहे. सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांवरसुद्धा असं बोललं जातं. आणि बोलणारा कोण आहे? तर पडळकर असा थेट आरोप आव्हाड यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता राज्यपालांच्या कानावर घालण्यात आली आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.