मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Jitendra Awhad : सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विधानभवनाच्या लॉबीत काल आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली होती. आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण झाली होती. विधानसभेच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद जास्त वाढला नाही. या सगळ्या प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता विधानसभेतही आमदार सुरक्षित नाहीत अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली होती.

कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांसमोर ठिय्या, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं; मध्यरात्रीही राडा

यानंतर नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरातून ताब्यात घेऊन मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेले जात होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांच्या जीपसमोर झोपून विरोध केला होता. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणं ही सत्तेची मस्ती आहे. मकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात कसा प्रवेश मिळतो. सीसीटीव्हीत दिसत आहे की पडळकरांनी इशारा करून नितीन देशमुखांना मारण्यास सांगितलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

आव्हाड यांच्यावर हल्ला करायचा होता. यासाठीच विधानभवनाच्या आवारात गुंड आणले होते. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर हे राज्य कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. सरकारच्या मर्जीनुसार चालणारं राज्य झालं आहे. सरकारच्या विरोधात जो कुणी आवाज उठविल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला संपवून टाकू ही तर सत्तेची मस्ती आहे अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

“सहकाऱ्यांची चूक असेल तर कारवाई करा, आता आम्ही..”,विधानभवन राडा प्रकरणी पडळकरांचं वक्तव्य

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube